बलिया – उत्तर प्रदेशात गंगा नदीच्या किनाऱ्यावर राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र ठेवून एका तरूणाने पिंडदानाचा विधी केला. या तरूणाला अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दलछपरा गावातील पाच ब्राम्हणांनी यासंदर्भात तक्रार केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार ब्रजेश यादव नावाच्या या व्यक्तीने त्यांना खोटी माहिती देत आज पहाटेच गंगा नदीकिनारी आणले व त्याने येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो लावून पिंडदान केले. त्याने या संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडीओ तयार केला असून तो व्हायरलही करण्यात आला आहे. आपण समाजवादी पक्षाचे कार्यकर्ता असल्याचे यादव याने सांगितले. झाला प्रकार गांभीर्याने घेत कारवाई करत ब्रजेश यादव याला अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.