खालापूर : भारतीय जनता पार्टी खालापूर पुर्व मंडळ अध्यक्ष सनी यादव यांच्या पुढाकारातून तालुक्यातील अनेक युवकांनी भाजपात जाहीररित्या पक्षप्रवेश केला. खारघर येथील कार्यक्रमात मंत्री गणेश नाईक, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या उपस्थित हे पक्षप्रवेश झाले.
ग्रामपंचायत देवन्हावे हद्दीतील दहिवली आणि अंजरून गाव येथील अनेक युवकांनी हाती कमळ घेत आमदार ठाकूर आणि सनी यादव यांच्या नेतृत्वात काम करण्याचे ठरविले. यामुळे तालुक्यात भाजपाची ताकद वाढली आहे.
केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार असल्याने अनेक कार्यकर्ते भाजपात पक्ष प्रवेश करण्यासाठी उत्सूक असून लवकरच आणखीन पक्षप्रवेश होतील असे सनी यादव यांनी सांगितले.