पिंपरी चिंचवडचे प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न करणार; अजित पवार


पिंपरी-चिंचवड : पालिकेतील नगरसेवकांनी आता नागरी प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घ्यावी, असे सांगून सध्याचे सत्ताधारी पिंपरी-चिंचवडकरांना पिण्याचे पाणी सुरळित देता येत नाही. शंख मात्र राष्ट्रवादीच्या नावाने फोडत आहे.

सध्या सत्ताधारींना कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करीत आहे का? टँकर माफीया आहे का? याची माहिती घेवून चांगले अधिकारी देण्याचा प्रयत्न महा विकासआघाडीच्या माध्यमातून करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितले.

पिंपरी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार आण्णा बनसोडे यांच्या निवडी प्रित्यर्थ पवार शहरात आले होते. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस मित्रपक्षाचे महा विकासआघाडीचे सरकार आहे. लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहे. आपल्या पक्षातील अनेक जण गेले त्याचा फटका पक्षालाही बसला आहे. पालिकेत 38 पक्षाचे नगरसेवक आहे असे म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत चूकीची कारभार दिसून आल्यास त्याची गय करणार नाही. उद्योग धंद्याची वाताहात थांबवून तरुणांना रोजगार द्यावा लागणार आहे. त्याचबरोबर न्यायालय, रिंगरोड, शास्तीकर, रेड झोन, अनधिकृत बांधकाम, आरोग्य शिक्षण, जमिनीचा साडेबारा टक्के परतावा, पिण्याचे पाणी, प्राधिकरणातील प्रश्न आदी प्रश्नाबाबत जिल्ह्याचा पालकमंत्री जो होऊल त्यांच्यामार्फत महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)