पिंपरी : लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विश्वकर्मा जयंती महोत्सव व स्नेह मेळावा आकुर्डी येथे नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात श्री प्रभू विश्वकर्मा आराधना आणि भजनाने झाली. कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडेगेरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शेलार यांनी केले. यामध्ये त्यांनी संस्थेच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे माहिती दिली.
प्रमुख पाहुणे युवराज जाधव यांनी समाजाने हेवे द्यावे बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन केले. समाजात सर्व संघटनांनी एकत्र येऊन कार्य केले तर विधायक कार्य होऊ शकते असे मत व्यक्त केले.
सूत्रसंचालन संस्थेचे सचिव प्रा. रामदास लाड यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन दत्ता लोहार, औदुंबर कळसाईत, संजीव दाते, डॉ. रामदास लाड, रमेश माने, महेश हरिहर, विजयकुमार सूर्यवंशी, संतोष मुळे, प्रशांत पोपसभट यांनी केले. तर कैलास कांबळे, शिवाजी कळशे, अमोल पवार, भारती शेलार, राजश्री हरिहर, मदन हारहारकर यांचे सहकार्य लाभले.