तळेगाव दाभाडे : श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची 739 व्या पुण्यतिथीनिमित्त तळेगाव दाभाडे मधील सोनार समाजाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये श्रीविठ्ठल मंदिर येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला. पारायणाचे नेतृत्व ह.भ.प. निवृत्ती महाराज फाकटकर यांनी केले. तसेच पारायणाची सांगता विद्यावाचस्पती ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज थोरात (मंचरकर) यांच्या कीर्तन सेवेतून झाली.
पुण्यतिथीच्या दिवशी सकाळी देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज भवन शाळा चौक येथे श्री.संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. सायंकाळी पालखी सोहळ्याचे आयोजन आळंदी येथील उद्धव महाराज शिंदे, आळंदी यांचे विद्यार्थ्यांचे वारकरी दिंडी पथक सह करण्यात आले. डीजे विरहित सोहळा साजरा करण्याचे सलग तिसरे वर्ष आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला आघाडी अध्यक्ष ज्योत्स्ना वाडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तळेगाव दाभाडे शहराचे देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज ट्रस्टचे उपाध्यक्ष अनिल फाकटकर यांनी केले. तसेच मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून विशेष कर्तृत्व गाजवणाऱ्या समाज बांधवाचा सन्मान करण्यात आला.