Pimpri : एकाच झाडाला गळफास घेत दोन मित्रांची आत्महत्या

पिंपरी : कालच गावाहून आलेल्या एकाच गावातील दोन मित्रांनी एकाच झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी भारतमाता चौकाजवळील खिरीड वस्ती, मोशी येथे उघडकीस आली.
तुषार अशोक ढगे (वय 25), सिकंदर सल्लाउद्दीन शेख (वय 30, दोघेही रा. हुंडा पिंपळगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) अशी गळफास घेतलेल्यांची नावे आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत तुषार ढगे आणि सिकंदर शेख हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत.
ते कालच मूळ गावावरून पुण्याला आल्याचे आले होते. त्यांनी शनिवारी सकाळी भारतमाता चौकाजवळील खिरीड वस्ती, मोशी येथील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे उघडकीस आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मयत तुषार यांच्या काका दत्तात्रय रावसाहेब ढगे (रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांना आत्महत्येबाबत कळविण्यात आले आहे.





