पिंपळे गुरव : एप्रिल आणि मे महिन्यात लग्नाचे अधिक मुहूर्त असल्याने या दोन महिन्यात सगळ्यात जास्त लग्नाचे बार उडणार आहेत. जून महिन्यात फक्त पाच मूहूर्त आहेत. ८ जून ते २२ नोव्हेबरर्यंत गुरूचा अस्त आणि चातुर्मास असल्याने लग्नाचे मुहूर्त नाहीत. एप्रिल आणि मे महिन्यातील मुहूर्ताना सर्वांची पसंती असल्याचे मंगल कार्यालय, हॉटेल्स, रिसॉर्ट आणि वेडिंग डेस्टिनेशच्या नोंदणीवरून दिसून येत आहे.
मे महिन्यात १२ दिवस लग्नाचेमुहूर्त असून या सर्व तारखांना हॉल आणि मंगल कार्यालयांचे अॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. एप्रिलमध्ये त्यापाठोपाठ आठ तर जूनमध्ये फक्त पाच मुहूर्त आहेत. आठ जूनपासून ते ११ नोव्हेंबरपर्यंत गुरूचा अस्त व चातुर्मास आहे. त्यामुळे लग्नाचे मुहूर्त नाहीत.
एप्रिल, मे आणि जून असे तीनच महिने सर्वाधिक मुहूर्त आहेत. १९ एप्रिलपासून यंदा डिसेंबर महिन्यापर्यंत फक्त २६ लग्नाचे मुहूर्त आहेत. नोव्हेंबरमध्ये एक आणि डिसेंबरमध्ये दोन असे तीनच मुहूर्त वर्ष अखेरीस आहे. पाच डिसेंबरपासून ते ६ फेब्रुवारीपर्यंत शुक्राचा अस्त आहे. त्यामुळे मुहूर्त नाहीत.
त्यामुळे एप्रिल आणि मेतील लग्नाचे मुहूर्त साधून घेण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू आहे. वधुवरांसोबतच लग्नाचे हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स, शालू, पैठणी आणि साड्या तसेच सराफा व्यापाऱ्यांमध्येही चैतन्य निर्माण झाले आहे. या सर्वांचीच लगीनघाई सुरू झाली आहे.
लग्नसराईमुळे फुलांचा बाजारही तेजीत
सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे हॉलमधील सजावट, गाडीला सजावट यासाठी फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने फूल बाजार सध्या तेजीत आहे. तसेच गावोगावच्या यात्रांमुळेही फुलांना मागणी असल्याने फूल विक्रेते सांगत आहेत.
एप्रिल आणि मे मध्ये सर्वाधिक विवाह मुहूर्त आहेत. गुरूचा अस्त, चातुर्मास आणि शुक्राचा अस्त असल्याने लग्नाचे मुहूर्त कमी आहेत. – भूपेश कुलकर्णी, ज्योतिषाचार्य
विवाह मुहूर्त २०२५
एप्रिल : १९, २०, २१, २२, २५, ३०
मे १, ६, ७, ८, ९, १०, १३, १४, १६, १८,२३,२४
जून : २, ४, ५, ६, ८
नोव्हेबर : २
डिसेंबर : २, ५