आजपासून व्होरॉक कप क्रिकेट स्पर्धा सुरू

पिंपरी – पीसीएमसीज व्होरॉक-वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या वतीने युवा खेळाडूंना प्रोत्साहीत करण्यासाठी 12 वर्षाखालील मुलांच्या व्होरॉक कप क्रिकेट स्पर्धेचे आयोजन दि. 22 एप्रिल ते 26 एप्रिल दरम्यान करण्यात आले आहे. थेरगाव येथील वेंगसरकर ऍकेडमी येथे होणाऱ्या या स्पर्धेत नामांकित आठ संघ सहभागी होणार आहेत.

स्पर्धेच्या सुरुवातीला दोन गटांमध्ये साखळी सामने होणार आहेत. त्यानंतर गुणानुक्रमे अव्वल संघामध्ये उपांत्य आणि त्यांनतर अंतिम सामना खेळवला जाणार आहे. प्रत्येक सामना 25 षटकांचा होणार असून या स्पर्धेत वेंगसरकर अकादमी अ व ब संघासह महेंद्र गोखलेज अकादमी, फ्रेंडस क्रिकेट क्‍लब, स्पार्क स्पोर्टस, विराग क्रिकेट अकादमी, एच.के बाऊंन्स, स्पोर्टस स्पार्क अकादमी हे संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे बक्षीस वितरण अंतिम सामन्यानंतर दि. 26 एप्रिल रोजी भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.