पिंपरीत स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्‍या व्यवसायाचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका

पिंपरी – स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्‍या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली. यावेळी दोन महिलांची सुटका करण्यात आली. पिंपळे गुरव येथील स्पेशल इफेक्‍ट स्पा सेंटर येथे सोमवारी (दि. 27) सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

गोपाल रमेश मिश्रा (वय 33, रा. रामनगर, येरवडा, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह एक महिला (वय 29, रा. हडपसर, पुणे) आणि जुबेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावळकर कॉलनी येथील स्पा सेंटरमध्ये दोन महिलांकडून आरोपी जबरदस्तीने वेश्‍या व्यवसाय करून घेत होते. पोलिसांनी सोमवारी सायंकाळी छापा मारून एकाला अटक केली व दोन महिलांची सुटका केली. या कारवाईत आठ हजार 30 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.