#Video | पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार

पिंपरी – पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 12) दुपारी एक वाजताच्या सुमारास काळभोर नगर येथे घडली. तानाजी पवार असे संशयित आरोपीचे नाव असल्याचे समजते. आरोपीने पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या आहेत.

पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळभोर नगर येथे आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. तिथे एका व्यक्तीने बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास गोळीबार केला. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही.

संशयित आराेपी

कार्यकर्त्यांनी आरोपीला चांगलाच चोप दिला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून शस्त्र देखील जप्त करण्यात आले आहे. ठेकेदारीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.