कर्जत : तालुक्यातील सांगवी येथे सोमजाई मातेचा उत्सव मंगळवार, दिनांक १४ जानेवारी रोजी होणार असून या उत्सवानिमित्त खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केले आहे.
यावेळी अभिनेत्री प्राप्ती रेडकर, साक्षी गांधी अशा मराठी कलाकारांची उपस्थिती असणार आहे. सोबत विजेत्यांसाठी मोठ्या प्रमाणात बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेत प्रथम दहा विजेत्यांना मानाची पैठणी, उत्तेजनार्थ २५ विजेत्यांना सोन्याची नथ देण्यात येणार आहे.
तसेच उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात काकड आरती, सत्यनारायण महापूजा, हरिपाठ होणार आहे. तर रात्री वासरेखोंडा परिसरातील वारकरी भजन करणार आहेत.