पिंपरी : रावेत- किवळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याची पोस्ट व्हायरल झली आहे. या पोस्टमध्ये रावेत परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सांगितले जात होत. मात्र ही अफवा असल्याचे समोर आले आहे. या परिसरात बिबट्या आढळला नसून ही पोस्ट अफवा असल्याचे वनविभागाच्या अधिकार्यांनी माहिती दिली.
रावेत भागात बिबट्याचा वावर असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. ‘कोहिनूर ग्रँड्युर, फेलिसिटी आणि सिल्वर ग्रेशिया सोसायटीच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी’ असे या पोस्टमधून सांगण्यात आले आहे. बिबट्याच्या या अफवेमुळे नागरिक मात्र चांगलेच धास्तावले होते. मात्र ही अफवा असल्याचे समजल्यानंतर या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.