पिंपरी – स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभाग व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने वाकड येथील ब्लॉझम सलून या स्पा सेंटरवर कारवाई करून पाच पीडित महिलांची सुटका केली. शुक्रवारी (दि. 17) ही कारवाई करण्यात आली.
“स्पा सेंटर’चा चालक-मालक सचिन सुरेश भिसे (रा. शिराढोण, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), स्पा सेंटरची मॅनेजर (रा. रहाटणी), अभय मारुतीराव छिद्री (रा. रहाटणी, काळेवाडी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलीस कर्मचारी सोनाली माने यांनी याप्रकरणी वाकड पोलिसांत फिर्याद दिली.
आरोपी सचिन भिसे आणि मॅनेजर महिला यांनी पैशांचे आमिष दाखवून पाच पीडित महिलांना जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून पीडित महिलांची सुटका केली. आरोपी अभय छिद्री याने त्याच्या नावावर असलेली जागा कोणताही करारनामा न करता आरोपी सचिन आणि मॅनेजर महिलेला उपलब्ध करून दिली. त्यांनी या जागेवर “स्पा सेंटर’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू केला.
वेश्या व्यवसायसाठी जागा उपलब्ध करून दिल्यामुळे जागा मालक अभय छिद्री याच्या विरोधात देखील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.