Pimpri : थकबाकी भरा अन्यथा पाणी होणार बंद

पिंपरी : महापालिकेच्या कर संकलन विभागाने आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्यात थकबाकीदारांचे पाणी बंद करण्याची कारवाई हाती घेतली आहे. यापुढे ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त घरमालकांकडे कराची थकबाकी असल्यास सोसायटीचे नळजोड खंडित करण्यात येणार आहे. त्यानुसार सोमवारी (दि. १७) र्हाडेवाडी येथील सिल्वर ओक्स या सोसायटीमध्ये कारवाई करण्यात आली.
कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर संकलन विभागाने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरूवात केली आहे. तसेच ज्या नागरिकांनी कर थकवला आहे त्यांचे पाणी बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, सोसायटीतील ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त घरमालकांकडे थकबाकी असेल तर नळजोड खंडित करण्यात येणार आहे. बोर्हाडेवाडी येथील सिल्वहर ओक या सोसायटीतील १२ पाण्याच्या ऩळजोड पैकी ६ जोड खंडित करण्यात आले आहेत.
कर वसुली करण्यासाठी विभागाने थकबाकीदार कंपन्या, कारखाने, शॉपिंग मॉल, पेट्रोल पंप, रूग्णालय, शाळा, महाविद्यालय, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल तसेच, निवासी मालमत्ता सील केल्या आहेत. कारवाईनंतर थकबाकीदार बिल भरत आहेत. त्या मालमत्तेचे सील काढण्यात येत आहे. तसेच, ५० हजार व त्यापेक्षा अधिक थकबाकी असलेल्या निवासी व बिगरनिवासी मालमत्तांकडून वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे.
ज्या सोसायटीची थकबाकी आहे, त्यांचे नळजोड खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. नागरिकांनी तातडीने कर भरावा जेणेकरून ही कटू कारवाई टाळता येईल.
– अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, पिं. चिं. महापालिका





