मावळ : कृष्णराव भेगडे शाळेत “वार्षिक क्रीडादिन’ उत्साहात

तळेगाव दाभाडे – येथील तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित, कृष्णराव भेगडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बुधवार (दि.23) रोजी “वार्षिक क्रीडादिन’ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची प्रस्तावना व ओळख शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी केली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना बोलावले होते.शाळेचा राष्ट्रीय क्रीडापटू मनोज रावत, नरेंद्र मुहाल, ज्योती यादव, श्रद्धा हिंगे, नेहा बोडके व संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे, संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, शाळेचे अध्यक्ष डॉ.दिलीप भोगे, संस्थेच्या खजिनदार गौरी काकडे उपस्थित होते. शाळेचे सर्व शिक्षक व विद्यार्थी देखील उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आली. त्यानंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी लेझिममधून सुंदर कलेचे प्रदर्शन केले .तसेच इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनीही “ड्रिल’ सादर करून, तर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थांनी “मानवी मनोरे ‘ सादर करून सर्वांची मने जिंकली. तसेच विद्यार्थी परेडही आकर्षणाचे केंद्र ठरली होती. काही विद्यार्थ्यांनी नृत्यप्रकारातून मानवी मनोरेही सादर करत उपस्थितांकडून वाह-वाही मिळवली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्यक्रमात सहभागी सर्व पाहुण्यांनी मनोगत व्यक्‍त केले. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर ,त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. आरोग्य संपन्न जीवनासाठी आपण रोज व्यायाम करावा किंवा रोज मैदानी खेळ खेळावेत, असे त्यांनी सांगितले.

त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष संदीप काकडे यांनीही आपले मनोगत व्यक्‍त केले. त्यांनी जीवनात खेळाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगितले. पाहुण्यांच्या हस्ते वेगवेगळ्या खेळातील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मेडल्स व प्रशस्तिपत्रक देऊन गौरवीण्यात आले . यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नववीच्या विद्यार्थिनी श्रुती दाभाडे व स्वरूपा फलके यांनी केले व आभार प्रदर्शन करुणा चव्हाण यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)