महापालिका संघाने सलग तिसऱ्यांदा जिंकली शूटिंग बॉल स्पर्धा

पिंपरी- पुणे जिल्हा आंतरकचेरी शूटिंग बॉल स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महापालिका संघाने अंतिम सामन्यात ईटन संघावर रोमहर्षक विजय मिळून ही स्पर्धा सलग तिसऱ्यांदा जिंकण्याचा बहुमान पटकावला आहे. पुणे जिल्हा शूटिंग बॉल असोशिएशन यांच्या वतीने पुणे जिल्हा आंतर कचेरी शुटींग बॉल स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.

या स्पर्धेत जिल्ह्यातील 16 संघानी सहभाग नोंदवला होता. अंतिम समाना पिंपरी-चिंचवड महापालिका संघ व ईटन संघ यांच्यामध्ये झाला. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात पिंपरी-चिंचवड महापालिका संघाने विजय मिळवून तिसऱ्यांदा विजयी होण्याचा मान मिळवला. महापालिका संघाकडून कर्णधार सुहास नाईक, विजय गांगुर्डे, दशरथ वाघोले, सोमनाथ वीर यांनी उत्कृष्ठ खेळ केला व संघाला विजेतेपद मिळवून दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)