दोन बिल्डरांवर गुन्हा दाखल

पिंपरी – महार वतनाच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्या दोन बांधकाम व्यवसायिकांवर ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना रावेत येथे घडली.

गुरुमुख सुखवानी आणि घनश्‍याम अग्रवाल (दोघेही रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यवसायिकांची नावे आहेत. सागर अंकुश जाधव (वय 43, रा. जाधवनगर, रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर यांची रावेत येथील सर्व्हे क्रमांक 73, 73 येथे 40 एकर महार वतनाची जमीन आहे.

या जमिनीचा ताबा सागर यांच्याकडे आहे. बांधकाम व्यवसायिक सुखवानी आणि अग्रवाल यांनी 2013 मध्ये या जागेवर अतिक्रमण केले. या जागेबाबत अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. 2 मार्च रोजी रात्री गुंडांनी येथील सुरक्षा रक्षक कदम यांना मारहाण करून सागर यांच्या झोपडीची तोडफोड केली. 14 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.