मोरवाडीत शॉर्टसर्किटमुळे काचेच्या कारखान्याला आग

पिंपरी – मोरवाडीतील “मोहम्मदिया आर्ट ग्लास’ या काचेच्या कंपनीत शनिवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली. अग्निशामक दलाच्या जवांनानी दाखवलेल्या सतर्कतेमुळे या आगीत अडकलेल्या चार कामगारांची सुटका केली. ही घटना शनिवार (दि.6) रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

इरफान शेख (वय 45), अखिल मुजावर (वय 45), आसिफ (वय 35) आणि शान बाज (वय 35) अशी सुटका करण्यात आलेल्या कामगारांची नावे आहेत. अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोरवाडी येथील मोहम्मदिया आर्ट ग्लास या कारखान्यात शनिवारी रात्री साडेअकारा वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती.

कंपनीमध्ये काम करणारे इरफान, अखिल, आसिफ आणि शान बाज हे चौघे कंपनीमध्येच झोपले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेवून आतमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढले. व त्यानंतर आग विझवण्यात आली. ही कामगिरी अग्निशामकचे अशोक कानडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.