पिंपरी : दुचाकी घसरून दोघांचा मृत्यू

पिंपरी – चिंचवड येथील थरमॅक्‍स चौकात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. अभिजीत बबनराव काटकर (वय-40, रा. संभाजीनगर, चिंचवड) व किरण भास्कर कानवडे (वय-29, रा. जाधववाडी, चिखली) असे अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत काटकर हे चिंचवड येथील थरमॅक्‍स चौकामधून दि. 17 फेब्रुवारी रोजी जात असताना त्यांची दुचाकी घसरुन अपघात झाला होता. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका घटनेत किरण कानवडे हे देखील आपल्या दुचाकीवरुन जात असताना त्यांची दुचाकी घसरल्याने ते देखील गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.