विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

पिंपरी – सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 27 जून रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास मोशी प्राधिकरण येथील संतनगर येथे घडली.

याप्रकरणी मयत विवाहितेच्या आईने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन, मयत विवाहितेचा पती एम. राजकुमार (वय-35), सासू एम.सिनी अम्माल (वय-28), ननंद एम. राजलक्ष्मी (वय-36) आणि एम. मूर्गलक्ष्मी (वय-29) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचा विवाह झाल्यापासून आरोपींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून तिने गुरुवार दि. 27 जून रोजी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.