जुन्या भांडणातून स्क्रू ड्राव्हयरने मारहाण

पिंपरी – पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन एकाला स्क्रूड्रायव्हरने जबर मारहाण करुन जखमी करण्यात आले. ही घटना मंगळवार (दि.25) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पिंपळे-निलख येथील भवानी स्वीट्‌सजवळ घडली.

महेंद्र करिया चव्हाण (वय 30, रा. आंबेडकरनगर बुध्द विहाराजवळ, पिंपळे निलख) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेश चौधरी (वय 22, रा. काळेवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जखमी महेंद्र हे ठेकेदार बन्नासिंग सोळंकी, कामगार राकेश कुमार वर्मा आणि लवकुश चव्हाण या तिघांसोबत भवानी स्वीट्‌जवळ उभे होते. यावेळी आरोपी योगेश तेथे आला त्याने पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन महेंद्र याला स्कू ड्रायव्हरने डोळ्यावर, कपाळावर आणि कानावर जबर मारहाण केली. आरोपी योगेश याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.