पाखली सोहळ्यात हात साफ करणारे तिघे गजाआड

पिंपरी – पालखी सोहळ्यात गर्दीचा फायदा घेवून चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कामगिरी गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. अर्जुन शेषराव शिंदे (वय-18 रा. इंदिरानगर ता. पाथरी, जि. परभणी), सचिन मच्छिंद्र पवार (वय-18, रा. आष्टा फाटा, ता. आष्टा जि. अहमदनगर), राजाराम साहेबराव शिंदे (रा. सुमित्रानगर, ता. माळशिरस जि. सोलापुर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.24) संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे देहू येथून लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यावेळी गर्दीचा फायदा घेत वारकऱ्यांचे मोबाईल, दागिने व पैसे चोरणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.