सर्व जाती धर्मियांच्या सर्वांगिण विकासाचे ध्येय – रामदास आठवले

बोपोडी – समाजातील सर्व जाती धर्मियांना सोबत घेऊन त्यांचा सर्वांगिन विकास साध्य केला जाईल, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी आज (दि. 23) बोपोडी येथे केले.

पुणे महापालिकेच्या वतीने बोपोडीमध्ये तीन कोटी निधीतून केलेल्या विविध विकास कामांचे उद्‌घाटन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. माता रमाई आंबेडकर विद्यालयात आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, खासदार गिरीश बापट, आमदार विजय काळे, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शहराध्यक्ष अशोक कांबळे, नगरसेविका सुनिता वाडेकर, अर्चना मुसळे, नगरसेवक प्रकाश ढोरे, विजय शेवाळे आदी उपस्थित होते.

आठवले पुढे म्हणाले, समाजाचा सर्वांगिण विकास होण्याकरीता त्यांच्या सर्व आवश्‍यक गरजा व सुविधा पुरविल्या जातील. चांगले प्रकल्प व योजनांकरीता आवश्‍यक निधीची तरतूद केली जाईल. महिलांनी बचत गटांअंतर्गत आपला विकास साध्य करावा व बचत गट अधिक मजबूत करावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. प्रास्ताविक परशुराम वाडेकर यांनी केले. तर आभार नगरसेवक प्रकाश ढोरे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.