पथदिव्यांच्या विद्युत यंत्रणेशी छेडछाड न करण्याचे आवाहन

पिंपरी – महापालिका इमारती, सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावरील पथदिव्यांच्या देखभाल दुरूस्तीचे काम महापालिकेतर्फे आवश्‍यकतेनुसार करण्यात येते. पथदिव्यांसाठी महापालिकेकडून 3 फेज 440 व्होल्टचा वीज पुरवठा केला जातो. तरी, नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पथदिवे व विद्युत यंत्रणेशी छेडछाड करू नये. या कृत्यामुळे कोणत्याही प्रकारची वित्त अथवा जीवित हानी झाल्यास महापालिका अशा दुर्दैवी घटनेस जबाबदार राहणार नाही, असे सह-शहर अभियंता प्रवीण तुपे यांनी कळविले आहे.

त्यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नागरिकांना विद्युतखांबाला अथवा फीडर पिलरला स्पर्श करू नये. विनापरवाना विद्युत पुरवठा घेऊ नये. जनावरे विद्युत दिव्यांच्या खांबाला बांधू नये. जंक्‍शन बॉक्‍सवर पाय ठेवून खांबावर चढू नये. कपडे वाळविण्यासाठी तारा पोलला बांधू नये. तसेच, पोलच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारची केबल/तारा खांबावरून ओढू नये. अशा प्रकारच्या कृत्यामुळे कोणत्याही प्रकारची वित्त अथवा जीवित हानी झाल्यास महापालिका अशा दुर्दैवी घटनेस जबाबदार राहणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.