तरुणीला वेगवेगळ्या मोबाईलवरून अश्‍लिल मेजेस

पिंपरी – नऊ वेगवेगळे मोबाईल क्रमांक वापरुन अज्ञात आरोपीने 30 वर्षीय तरुणीच्या व्हॉट्‌सऍप क्रमांकावर अश्‍लील मेसेज पाठवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवार (दि. 14) ते रविवार (दि.16) या कालावधीत घडली.

या प्रकरणी पीडित 31 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात ईशान नावाच्या आरोपीने तरुणीवर पाळत ठेवून तिच्या व्हॉट्‌सऍप क्रमांकावर नऊ वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून अश्‍लील मेसेज पाठवले. तसेच, सदर तरुणीला वारंवार फोन करुन मानसिक त्रास दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.