पिंपरी – दोन कुटुंबे आपला हक्क सांगत असलेल्या जमिनीवर मुरुम टाकल्याच्या कारणावरुन तुंबळ हाणामारी झाली. ही घटना शनिवारी (दि.8) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पिंपळे सौदागर येथील शिंदे कॉलनी, केशवनगरमधील डेस्टिनी सोसायटीच्या समोर घडली.
याप्रकरणी शिंदे आणि काटे कुटुंबियांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली असून सांगवी पोलीस ठाण्यात 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जीवन काटे, भूषण काटे, गणेश काटे आणि त्यांचे अज्ञात साथीदार तसेच शुभम शिंदे, प्रसाद शिंदे, दत्तात्रय शिंदे, सुरेखा शिंदे आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केशवनगर, डेस्टिनी सोसायटीच्या समोरील जमिनीवर शिंदे आणि काटे कुटुंब दावा करत आहेत. शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास या जमिनीवर मुरुम टाकण्याच्या कारणावरुन दोन्ही कुटुंबात लाकडी फावड्याने तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी दोन्ही कुटुंबातील 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक केलेली नसून सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.