पिंपरी -पिंपरी, खराळवाडी येथील समोसा उत्पादक एम. के. एन्टरप्रायजेसवर अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत जनहित व आरोग्य यांच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या तरतुदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई केली.
समोसा तळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलाचा तीन वेळा वापर करण्यात आला होता. वापरलेल्या तेलाची विल्हेवाट कशी लावली, याचा अभिलेख न ठेवणे. उत्पादन कक्षात अस्वच्छता निर्माण करणे या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहे. ज्या त्रुटी आढळून आल्या त्याचा जोपर्यंत खुलासा होत नाही, तो पर्यंत संबंधिताला उत्पादन व विक्री थांबविण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
या उत्त्पादकाकडून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील नामांकित सिनेमागृहांना या समोशाची विक्री केली जात होती. नागरिकांना सुरक्षित, सकस अन्नपदार्थ पुरविणे बंधनकारक आहे. शहरातील नाश्ता विक्रेते व विविध खाद्य उत्पादकांनी या बाबत काळजी घेणे गरजेचे आहे. खाद्य पदार्थांचे उत्पादन करणाऱ्यांनी आपली तपासणी करणे गरजेचे आहे.