शिवी दिल्याने घरात घुसून मारहाण

पिंपरी – भावाने शिवीगाळ का केली? असे म्हणून एकाच्या घरात घसून मारहाण केली. ही घटना चिंचवड येथील गुलमोहर मार्केट परिसरात दि. 7 जून रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी हर्षल रविंद्र थिटे (वय- 29 ) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरुन, संकेत जयवंत गावडे (वय-26 रा. गुलमोहर केशवनगर, चिंचवड) व जयवंत गावडे (वय-56) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षल यांच्या भावाने जयवंत गावडे यांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन आरोपींनी फिर्यादीच्या घरी जावून फिर्यादी, त्यांची बहीण व पत्नी यांना धक्काबुक्की केली. तसेच फिर्यादी यांना लाथाबुक्‍क्‍याने मारहाण करुन सिमेंटचा गड्डु डोक्‍यात मारुन जखमी केले. याप्रकरणी अधिक तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)