पिंपरी – निगडी येथील पीएमपीएमएल थांब्यावर थांबलेल्या तरुणाच्या खिशातील मोबाईल तिघांनी जबरजस्तीने चोरुन नेला. ही घटना 7 डिसेंबर 2018 रोजी घडली. याप्रकरणी चेतन मुकुंदा बोरसे (वय-24 रा. आंबेठाण, ता. खेड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तीन अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे निगडी पीएमपीएमएल बस थांब्यावर बसची वाट पाहत होते. त्यावेळी, तेथे थांबलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या खिशातील 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला. अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत.