पिंपरी – भारतीय इतिहासातील कर्तबगार स्त्री म्हणून ओळख असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून जागा उपलब्ध करून देण्यात यावी, या जागेवर त्यांच्या जीवनावरील प्रसंगांना म्युरल्सच्या माध्यमातून उभारावे, अशी मागणी माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
सध्या मोरवाडी चौकात असलेला अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा अत्यंत कमी जागेत असल्याने कुठल्याही कार्यक्रमासाठी नागरिकांना तेथे उभे रहाता येत नाही. यामुळे येथील महापालिकेच्या जागेवर मोठ्या रुपात नव्याने पुतळा स्थलांतरीत करण्याची व अहिल्यादेवी यांच्या जीवनावरील जीवनपट म्युरल्सच्या माध्यमातून उभारण्याची मागणी सोनकांबळे यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.