महिंद्रा ‘सीआयई’कडून वल्लभनगर आगारात स्वच्छता मोहिम

पिंपरी – चाकण येथील महिंद्रा सीआयई लिमिटेड या कंपनीकडून भारत स्वच्छता मोहिमेंतर्गत वल्लभनगर येथील एस.टी. स्टॅंड व आगारात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यावेळी शेकडो किलो मद्यांच्या बाटल्या व कचरा गोळा करण्यात आला. कंपनीचे कार्यकारी संचालक रमेश कौल व नगरसेविका सुजाता पालांडे यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहिम यशस्वी करण्यात आली.

मोहिम यशस्वी करण्यासाठी स्वच्छता मोहिमेत वल्लभनगर बसस्थानकामधील प्लॅस्टीकच्या बाटल्या, विविध प्रकारचा कचरा, दारुच्या बाटल्या, रिकाम्या पिशव्यासह सर्व प्रकारची स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. 1 टनाहून कचरा यावेळी संकलीत करून परिसर स्वच्छ करण्यात आल्याचे सुनील नरके, अनिल काला यांनी सांगितले. स्वच्छता मोहिमेत कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×