पत्नी सोडून गेल्याने आत्महत्येचा प्रयत्न

पिंपरी -पत्नी सोडून गेल्याने आलेल्या नैराश्‍यातून तरुणाने दारूच्या नशेत धारदार शस्त्राने स्वत:च्या हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. सागर बाळासाहेब पवार (वय- 24, रा. सोपान कुटे चाळ, हनुमान मंदिरामागे, आकुर्डी) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणावरुन झालेल्या घरघुती भांडणातून काही दिवसांपूर्वी सागर यांची पत्नी घर सोडून गेली होती. यामुळे सागरने बुधवारी रात्री दारुच्या नशेत डाव्या हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)