एसटी वाहकाला बेदम मारहाण

अर्धे तिकीट मागणाऱ्या प्रवाशाला मागितला वयाचा पुरावा

पिंपरी – अर्धे तिकीट मागणाऱ्या प्रवाशाला जन्मतारखेचे ओळखपत्र किंवा वयाचा पुरावा मागितला, म्हणून एसटीच्या वाहकाला मारहाण केली. ही घटना नाशिक फाटा पसिरात दि. 23 मे रोजी सकाळी सव्वा नऊ वाजताच्या सुमारास घडली.

तायप्पा सोपान कर्चे (वय-43 रा. सासवड) असे मारहाण केलेल्या वाहकाचे नाव आहे. त्याने भोसरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन नंदकुमार बाळकृष्ण दाभाडे (वय-65 रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक
करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, फिर्यादी हे बस क्र. एमएच 14/बीट/ 3389 वरुन वाहक म्हूणन कर्तव्यावर असताना आरोपी नंदकुमार यांनी त्यांना अर्धे तिकीटाची मागणी केली. त्यावेळी, वाहक तयप्पा यांनी त्यांना जन्मतारखेचे ओळखपत्र मागितले. मात्र आरोपींनी ओळखपत्र न दिल्याने वाहक ताय्यप्पा यांनी त्यांना पूर्ण तिकीट दिले. त्यावेळी आरोपीने चिडून त्यांना हाताने मारहाण केली, तसेच त्यांच्याजवळील इलेक्‍ट्रीक मशीन आपटून तिचे नुकसान केले. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×