पिंपरी – चारचाकी वाहनाने धडक दिल्याने 22 वर्षीय युवक गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाला. ही घटना 10 मे रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मोरेवस्ती चिखली येथे घडली. सुनील भागवत शिंदे (वय-22) असे मयत युवकाचे नाव आहे.
याप्रकरणी संजय भागवत शिंदे (वय- 34) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चारचाकी वाहनाच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनील हा मोरेवस्ती येथील अंगणवाडी कॉलनी येथील दारुच्या दुकानासमोरुन जात असताना त्याला चारचाकी वाहन (क्र. एमएच 03/ सी.व्ही.1999) च्या चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवित सुनील याला जोराची धडक दिली. यात तो गंभीर जखमी होवून उपचारादरम्यान मयत झाला आहे. याबाबत अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.