दापोडी – कै. शांताराम बाईत प्रतिष्ठान व माउली क्लिनिक यांच्या वतीने जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने कष्ट करुन मुलांना घडविणाऱ्या कर्तुत्ववान महिलांना आई गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गंगुबाई बाराथे, डॉ. दत्तात्रय बाराथे, संघमित्र बाराथे सोनाली काळे यांच्या हस्ते रुक्मिणी भोसले, ऐश्वर्या मडगावकर, शोभा जोशी, ऐस्तर साळवी, उषा जिनवाल, आरती चंदा, विमल भुलाडे, निर्मला बहुले या मातांना स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ऐस्तर साळवी यांनी, आई हे मोठे धन आहे. आईमुळे मुलांचा सन्मान होतो. मुलांनी नेहमी आपल्या आई-वडिलांचा सन्मान करावा. आपल्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल असावे यासाठी आपली आई कष्ट घेत असते. त्याची जाण प्रत्येकाने ठेवायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी दापोडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वसंत काटे, रमा बाराथे, नंदा ओव्हाळ, मंगल आरगडे, कांता डुलुगज, निर्मला बहुले, राधाबाई शिंदे, मधुकर पवार, डॉ. हर्षल बाराथे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र बाईत यांनी केले. संदीप बांगर यांनी आभार मानले.