पिंपरी -पिंपरी कॅम्प चौकातील आर्य समाज शाळेलगतच्या चौकाला महापालिकेकडून राष्ट्रसंत गाडगे महाराजांचे नाव देण्यात आले आहे. चौकात लावण्यात आलेल्या नामफलकावर काही जाहिरातदारांकडून अनधिकृतरीत्या व्यावसायिक जाहिराती लावल्या आहेत. संबधित जाहिरातदारांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भीम संग्राम संघटना अध्यक्ष राहुल वडमारे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत वारंवार लेखी निवेदने दिली आहेत. संबधितावर दहा दिवसांत फौजदारी कारवाई करावी, अन्यथा भीम संग्राम संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.