ऑनलाईन मोबाइल विक्रीतून फसवणूक

पिंपरी -ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून बोलत असून कमी किंमतीत मोबाईल देण्याचे अमिष दाखवून एकाची दहा हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सांगवी येथील मल्लीकार्जुन महादेव बिराजदार (वय- 36) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सचिन (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मल्लीकार्जुन बिराजदार यांना आरोपी सचिन याने फोन करुन तो ऍटोजशॉपिंगहब या कंपनीमधून बोलत असल्याचे सांगितले. व त्यांना सॅमसंग कॅट्रो कंपनीचा मोबाईल दहा हजार रुपये किंमतीमध्ये देण्याचे अमिष दाखवले. हे दहा हजार रुपये कंपनीच्या नावे असलेल्या एक्‍सिस बॅंकेच्या खात्यावर पाठवण्याची विनंती केली. त्यानुसार मल्लीकार्जून यांनी संबंधित कंपनीच्या खात्यावर दहा हजार 5 रुपये पाठविले. पैसे पाठवल्यानंतर आरोपीने मोबाईल दिला नाही तसेच त्यांचे पैसेही परत न देता फसवणूक केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.