घोरावडेश्वर डोंगर प्लॅस्टिक मुक्त करण्याचा संकल्प

निगडी – मित्र परिवार सोशल फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी उपक्रमांतर्गत प्लॅस्टिक मुक्त घोरडेश्वर मोहीम राबविण्यात आली.

फाउंडेशनच्या सदस्यांसह त्यांच्या कुटुंबियांनीही यामध्ये सहभागी झाले होते. मित्र परिवारातील काही सदस्य रोज सकाळी प्राधिकरण मधून सायकल चालवत गहुंजे क्रिकेट मैदानाच्या बाजूने घोरवडेश्वर येथे व्यायाम आणि सरावासाठी जात असतात. तिथले अस्वच्छतेचे चित्र पाहून काही सदस्यांनी प्लॅस्टिक मुक्त घोरवडेश्वरचा विचार मांडला आणि सर्वांनी तो अंमलात आणला. आज मंदिर परिसर, दरी परिसर येथून 15 पोती भरून प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला. मंदिर परिसर आणि समोरील दरीमध्ये पडलेला प्लॅस्टिक कचरा सदस्यांनी गोळा करून खाली आणला आणि महापालिकेच्या कचरा संकलन विभागात जमा केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.