पिंपरी- हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या तरुणाला हॉटेलच्या वेटर आणि मॅनेजरने मारहाण केली. ही घटना हिंजवडी येथील लक्ष्मी विलास हॉटेल येथे घडली.
तन्मय प्रेमप्रकाश शर्मा (वय- 21 रा. हिंजवडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बालाजी जाधव, अविनाश नारवाड, व दिपक या तिघांविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी घरी परत जात असताना हॉटेलमधील एका वेटरने “तुम्हाला एवढा वेळ लागतो का गाडी मागे घेण्यासाठी’असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ केली. व आणखी एक वेटर व मॅनेजरला बोलावून घेतले व तिघांनी मिळून फिर्यादीस लाकडी दांड्याने बेदम मारहाण करुन
जखमी केले.