शटर उचकटून पळवली औषधे; देवाची मूर्ती

पिंपरी -दापोडी परिसरातील लुंकड हॉस्पिटल जवळील बंद मेडिकलच्या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारुन औषधे, रोख रक्कम आणि देवाची मूर्ती पळवून नेली. ही घटना दि. 2 मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

बिपीन सतीश लुंकड (वय- 44 रा. बस स्टॅण्ड समोर, दापोडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बिपीन लुंकड हे दि. 2 मे रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मेडीकल बंद करुन घरी गेले.

त्यानंतर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे पत्र्याचे शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला व औषधे, रोख रक्कम तसेच देवाची मूर्ती असा एकूण 32 हजार 200 रुपयाचा ऐवज पळवून नेला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.