जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रोचे बॅरिकेडस्‌ हटविले; वाहतूक सुरळीत

पिंपरी – मेट्रोच्या कामामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होत असल्याची तक्रार करत, एप्रिल अखेरपर्यंत याठिकाणचे काम पूर्ण करुन बॅरिकेडस्‌ हटविण्याची सूचना महापालिका पदाधिकाऱ्यांनी मेट्रो प्रशासनाला बैठकीदरम्यान केली होती. त्याची दखल घेत, मुख्यालयासमोरील काही बॅरीगेटस्‌ मेट्रोने हटविले आहेत. त्यामुळे याठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून वाहनचालकांची सुटका झाली आहे.

महापालिका पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत मेट्रो आणि महापालिका अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महापालिका भवनात पार पडली. यावेळी बॅरीगेटस्‌ हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. एचए कंपनीजवळ काही बॅरिकेडस्‌ काढल्याने याठिकाणी वाहतूक कोंडी होत नाही. मात्र पुढील मार्गावर सर्व ठिकाणी बॅरिकेडस्‌ असल्याने वाहतुकीसाठी एकच लेनशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे या सर्वच ठिकाणी वाहतुकीचा मोठा ताण असतो. ही बाब टाळण्यासाठी हे काम पूर्ण करुन बॅरिकेडस्‌ हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

कामाची पाहणी करुन शक्‍य त्याठिकाणी बॅरिकेडस्‌ काढून टाकण्याची तयारी या अधिकाऱ्यांनी दर्शविली होती. त्यानंतर त्वरित या ठिकाणचे काम पूर्ण करुन आज वाहतुकीला बॅरिकेडस्‌ हटविण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.