पिंपरी – बांधकाम साईटवर काम करणाऱ्या सुरक्षा रक्षक व कामगारांनी काम करु नये म्हणून 10 ते 15 जणांच्या टोळक्यांनी गोंधळ घातला. ही घटना 27 एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास वाकड येथील आईसलॅण्ड सोसायटीच्या समोर बांधकाम साईडवर घडली.
याप्रकरणी विशाल कांतीलाल जैन (वय-45 रा. नवीपेठ, पुणे) यांनी दिलेल्या फिर्याद दिली असून विशाल संजय गायकवाड व त्याच्या 10 ते 15 साथीदारांविरोधात वाकड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे असून फिर्यादी जैन यांचे वाकड येथे बांधकाम सुरु आहे. यातील आरोपीने त्याच्या साथीदारांसोबत बाधंकाम साइटवर हातात लाठ्या-काठ्या व हत्यार घेऊन कामगार व सुरक्षारक्षकांना काम करु नका, म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच “तुम्ही येथे काम करायचे नाही, पुन्हा येथे आलात तर कापून टाकीन’ अशी धमकी दिली.