वडगाव मावळ -पॉली हाऊसच्या पाण्याच्या टाकीत पडून चार वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. निगडे (ता. मावळ) येथे सोमवार (दि. 29) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. राजकुमार कमलनारायण मरावी (वय 4, रा. निगडे, ता. मावळ) असे पाण्यात टाकीत पडून मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजकुमार मरावी हा “पॉली हाऊस’च्या पाण्याच्या टाकीत सोमवारी (दि. 29) दुपारी एक वाजता पडला. त्याला त्यांचे वडील कमलनारायण मरावी यांनी बाहेर काढून वैद्यकीय उपचारासाठी तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये आणले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. यासंदर्भात वडगाव पोलीस ठाण्याला डॉ. रोहिणी पोतदार यांनी दिली. या प्रकरणी पोलीस नाईक राजेंद्र पवार तपास करीत आहेत.