पिंपरी – पिंपळे गुरव येथे गेट समोर लावलेली रिक्षा पुढे लावण्यास सांगितल्याचा राग आल्याने रिक्षा चालकाने ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण केल्याची धटना शुक्रवारी (दि.26) घडली. याप्रकरणी धनंजय बबन सोनवणे (वय-63 रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली असून रिक्षा चालक (एमएच 12 एम.डब्ल्यू0362) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कुणाल आयकॉन येथून त्यांच्या गाडीतून जात असताना आरोपीची रिक्षा त्याने गेट समोरच लावली होती. ही रिक्षा बाजूला कर, असे सांगितले असता रिक्षा चालकाने शिवीगाळ करत बांबूने सोनवणे यांना मारहाण केली. यात त्यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला. सांगवी पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत.