कासारवाडीमध्ये गैरसमजातून तरुणाला मारहाण

पिंपरी – भांडणे सुरु असताना मध्ये गेलेल्या तरुणाला गैरसमजातून चार जणांनी लाकडी दांडक्‍याने व सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.26) कासारवाडी येथील मैलाशुद्धीकरण प्रकल्पावर घडली. राहुल वसंत थोरात (वय-24 रा.चिंचवड) यांनी चार अनोळखी इसमा विरोधात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हा कासारवाडी येथील मैला शुद्धीकरण प्रकल्पावरील मशीन ऑपरेटर म्हणून काम करतो. तर प्रकाश शेट्टी त्यांचा सहकर्मचारी आहे. शेट्टीचा भाऊ चेतन व त्याच्या मित्रांमध्ये शुद्धीकरण केंद्राच्या गेटवर भांडणे सुरु होती. यावेळी राहुल यांनी गेटवरील सुरक्षा रक्षकाकडे कोणालाही आतमध्ये का सोडतो अशी विचारणा केली? तेथे सुरु असलेल्या भांडणातील चार इसमांनी ही चेतनचाच कोणीतरी असल्याच्या गैरसमजातून लाकडी दांडक्‍याने व सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.