मावळ व शिरुर लोकसभा : ‘इव्हीएम’ तपासणीला सुरुवात

पिंपरी – मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघात अवघ्या आठ दिवसांवर मतदान येवून ठेपल्याने निवडणूक विभागाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून सध्या बालेवाडी येथील क्रीडा संकुलात “इव्हीएम’ची तपासणी करण्यास सुरूवात झाली आहे.

मावळ व शिरुर लोकसभा मतदार संघात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या दोन्ही मतदार संघात वापरण्यात येणाऱ्या “इव्हीएम’ची निवडणूक विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे. हे काम गुरुवार दि. 25 एप्रिलपर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे.

त्यानंतर सुरक्षा व्यवस्थेमध्ये या मशीन मतदानाच्या दिवशी संबंधीत मतदान केंद्रावर पाठवण्यात येणार आहेत. मतदानापूर्वी काही मशीनवर “मॉक पोल’ देखील घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सध्या बालेवाडी येथील क्रीडा संकुलामध्ये हे मतदानाचे काम सुरु असल्याने या परिसराला पोलिसांची सुरक्षा देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.