कर्ज देण्याच्या आमिषाने गंडा

पिंपरी -कमी व्याज दरात गृह कर्ज, मोटार कर्ज, वैयक्‍तिक कर्ज देतो म्हणून तब्बल सव्वा दोन लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी कय्यूम दादापीर रामदुर्ग (वय-46 रा.कासारवाडी) यांनी फिर्याद दिली असून अमित गुप्ता, गार्गी शर्मा, ऊमर मोहम्मद व हितेश रमेश परमार (रा. कान्हे, मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुस्तम कन्सलटंन्सी प्रायव्हेट लिमिटेड या नोयडा दिल्ली येथील कंपनीद्वारे कमी व्याजदरात कर्ज मिळवून देतो असे आमिष दाखवले. कय्यूम यांना विश्‍वासात घेऊन फाईल चार्ज व ऍग्रीमेन्ट चार्ज अशा वेग-वेगळ्या कारणास्तव 2 लाख 24 हजार 350 रुपये घेतले परंतु कर्ज मंजूर करण्यात आले नाही. आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच कय्यूम यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Leave A Reply

Your email address will not be published.