मतदान जनजागृतीसाठी सायकल मित्रांनी केली 785 किलोमीटरची यात्रा

भोसरी – सायकल मित्रच्या सायकलपटूंनी मतदान जनजागृतीसाठी चार दिवसात एकूण 785 किलोमीटर अंतर पार करीत अष्टविनायक सायकल यात्रा पुर्ण केली. प्रकाश पाटील, विनायक पवार आणि बापू शिंदे अशी सायकलपटूंची नावे आहेत.

भोसरी येथून सायकल यात्रेला सुरूवात झाली. सर्वप्रथम मरकळमार्गे थेऊर येथील चिंतामणीचे त्यांनी दर्शन घेतले. तेथून मोरगावकडे निघाले. सकाळी आठ वाजता मयूरेश्‍वराचे दर्शन घेतले. पुढे सिद्धटेक येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. विनायक पवार यांना सायकल यात्रा अर्धवट सोडावी लागली. मात्र, पाटील आणि शिंदे हे दोघे सकाळी रांजणगावाजवळ पोहचले. त्यानंतर ओझरकडे दोघांनी कूच केली. त्यानंतर लेण्याद्रीकडे दोघे मार्गस्थ झाले. पहाटे सूर्योदयाच्या अगोदर लेण्याद्रीचे दर्शन झाले. पुढे त्यांनी पालीचा बल्लाळेश्‍वर आणि महाडच्या वरद विनायकाचे दर्शन घेत यात्रा पूर्ण केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.