पिंपरी – जाब विचारला म्हणून तरुणाने एकाला सिमेंटच्या गट्टुने मारहाण केल्याची घटना चिंचवड येथे शनिवारी (दि. 6) घडली. सोपान तुकाराम वेताळे (वय-50), संजय किसन वेताळे (वय-25, दोघेही रा. चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आईला आरोपी सतत त्रास देत होता. यावरून फिर्यादी यांनी संजयला तू माझ्या आईला त्रास का देतोस म्हणून जाब विचारला असता संजयने तिथे पडलेला सिमेंटचा गट्टु फिर्यादीच्या डोक्यात घालून जखमी केले. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.