पिंपरी : बंदुकीच्या दस्त्याने एकाला मारहाण

पिंपरी – क्रीमरोल खराब असल्याची तक्रार दिली म्हणून ग्राहकास बेकरी मालक व बेकरीच्या गाळा मालकाने हाताने व बंदुकीच्या दस्त्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना पिंपरीतील संत तुकारामनगर येथे घडली.

याप्रकरणी प्रदीप महादु दगडे (वय-58, रा. संत तुकारामनगर) यांनी फिर्याद दिली असून गाळा मालक संतोष रमेश शिरभाते (वय-40, रा. वल्लभनगर) व बेकरी मालक एजाज फारुक अन्सारी (वय-36, रा. संत तुकाराम नगर) अशी आरोपींची नावे असून यातील एजाजला पोलिसांनी अटक केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप हे बेकरीमध्ये क्रीमरोल घेण्यासाठी गेले असता क्रीमरोल खराब असल्याची तक्रार केली. यातून एजाज याच्याशी वाद झाला. यावेळी एजाजने बेकरीचा गाळा मालक संतोषला बोलावले. संतोष तेथे आला व तेथे येवून बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली व बंदुकीच्या मुठीने मानेवर मारत शिवीगाळ केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)